विक्रमगड: पालघर जिल्ह्यातील 118 शाळांना '5 स्टार' मानांकन, 3 हजारांहून अधिक शाळांचे आत्ममूल्यांकन पूर्ण
पालघर जिल्ह्यातील 3,137 शाळांनी आपलं स्वयंमूल्यांकन पूर्ण केलं असून, 118 शाळांना 'फाइव्ह स्टार' मानांकन मिळालं आहे. या शाळांनी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक वातावरण तयार केलं आहे. उपक्रम जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.