विक्रमगड: शाळेत उठाबशा काढण्याच्या शिक्षामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू ; वसई येथील घटना
वसई येथील सातिवली परिसरात श्री हनुमान विद्यामंदिर शाळा आहे. यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात शाळेत विद्यार्थी उशिरा आल्याने त्यांना शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. उठाबशा काढल्याने काजल गौंड या विद्यार्थिनीची प्रकृती घरी परतल्यानंतर बिघडली. तिला वसईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिची प्रकृती बिघडल्याने अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.