विक्रमगड: एसटी बसचा चोथ्याचीवाडी येथे भीषण अपघात; 17 प्रवासी जखमी
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा चोथ्याचीवाडी येथे भीषण असा अपघात घडला आहे. तीव्र उतारावरून जात असताना समोरून वाहन आल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस तीव्र उतारावरून रस्त्यावरून खाली उलटली. या अपघातात बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.