विक्रमगड: वसई येथे रेवती इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड ऑफिस युनिटला लागली आग
वसई येथील वालीव परिसरात रेवती इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड ऑफिसच्या युनिटला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मात्र सामान साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.