डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेत डहाणू येथे सूर्या प्रकल्प उजवा कालवा लघुपट बंधारे विषयक बैठकीचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना अनेक वर्ष नव मिळालेला मोबदला व यासंबंधी प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी आमदारांसमोर मांडले. संबंधित विभागाने शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून आक्रमक पवित्र घेतला जाईल असे आश्वासन व भूमिका आमदार निकोले यांनी बैठकीत मांडली. या बैठकीस शेतकरी नागरिक माकपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.