विक्रमगड: विरार रेल्वे स्थानक येथे आरपीएफ आणि जीआरपी मार्फत करण्यात आले मॉक ड्रिल
पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल आरपीएफ विरार आणि ग्रुप रेल्वे पोलीस जीआरपी वसईच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. विरार रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर विस्फोटक सामग्री आढळण्याच्या परिस्थितीत हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. यावेळी एसओपीचे पालन करत आपत्कालीन स्थितीत प्रभावी कामगिरी करण्यात आली. या मॉकटेल मध्ये आरपीएफ , एमएसएफसी 24 आणि जीआरपीचे 16 सदस्य सहभागी झाले.