विक्रमगड: जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार कुष्ठरुग्ण शोध मोहीम; मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे
2017 पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार हे लक्ष गाठण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून यासाठी 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोगडा शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील 100% लोकसंख्येची तपासणी, शहरी भागातील 30 टक्के जोखीमग्रस्त लोकांचे सर्वेक्षण या मोहिमेद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली आहे.