विक्रमगड: वसई येथे भाजपच्या वतीने बिहार निवडणुकीतील विजयाचा साजरा करण्यात आला जल्लोष
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजप व एनडीएच्या घटक पक्षांनी अबूतपूर्व यश मिळवले आहे. या यशाचा जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या वतीने वसई येथे साजरा करण्यात आला. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत भाजपाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आले. एकमेकांना लाडू पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.