रामटेक शोभायात्रा उत्सवाकरिता विविध समित्यांची घोषणा
Ramtek, Nagpur | Nov 3, 2026 भारतीय जनसेवा मंडळ रामटेक च्या वतीने रामटेक येथे मागील 42 वर्षापासून आयोजित होणाऱ्या भव्य शोभायात्रेच्या पूर्वतयारीसाठी रामेश्वर रामटेक येथे नंतर दीप हॉटेल रामटेक येथे सभा संपन्न झाली. राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल, भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, महासचिव तथा माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, सहसचिव सुभाष बघेले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाल्यानंतर जनसेवा मंडळाद्वारे आयोजन शोभायात्रा समितीचे घोषणा दीप होटेल येथे करण्यात आली. आयोजन समितीचे अध्यक्षपदी राजेश किंमतकर तर कार्याध्यक्षपदी राहुल गुंडरे यांची निवड करण्यात आली. याचप्रमाणे निधी संकलन समिती, प्रशासकीय परवानगी समिती, निरीक्षण स्थळ समिती, द्वार निरीक्षण समिती, झाकी नियंत्रण समिती, मंच व्यवस्थापन समिती, प्रचार,प्रसार व प्रसिद्धी समिती, सोशल मीडिया समिती, भोजन व्यवस्था समिती, निरीक्षक व्यवस्था समितीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली.