नागार्जुन रामटेक परिसरात दोन ट्रकची जोरदार धडक; चालक- वाहक थोडक्यात बचावले
Ramtek, Nagpur | Nov 1, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या रामटेक - तुमसर मार्गावरील बुद्ध महाविहार नागार्जुन समोर तुमसर कडून रामटेकडे भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 31 CB 5611 व एम एच 40E 29 55 या दोन ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात शनिवार दिनांक 31 ऑक्टोबरला रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडल्याचे कळते. या अपघातात ट्रकचे चालक व वाहक थोडक्यात बचावले. मात्र ट्रकचे बरेच नुकसान झाले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ट्रक बाजूला करून ती पुर्ववत करण्यात आली. अपघाताचे दृश्य एवढे भीषण होते की यात मोठी हाताहत झाल्याचे चित्र होते. मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.