कामठी: रेल्वे रुळावर आढळला तरुणाचा मृतदेह, नवीन कामठी पोलिसांचा तपास सुरू
कामठी परिसरात रेल्वे रुळावर एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची दुर्घटना समोर आली आहे. कृष्णा यादव (२२ वर्षे, रा. बालाजी नगर, रनाला) असे मृत तरुणाचे नाव आहे.कृष्णा मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शौचास जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, खूप उशीर होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शोधाशोधदरम्यान रेल्वे रुळाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.