रामटेक जवळील अंबाळा वळणावर पत्ताकोबी भरलेला ट्रक उलटला ; मोठा अनर्थ टळला.
Ramtek, Nagpur | Nov 15, 2026 रामटेक शहराच्या पूर्व सीमेवर असलेल्या अंबाळा वळणावर शनिवार दिनांक 13 नोव्हेंबरला रात्री एक वाजताच्या सुमारास पत्ता कोबी घेऊन रामटेकडून जाणारा एक ट्रक उलटला. हे वळण आधीपासूनच अपघात प्रणव स्थळ आहे. एमएच४० सीडी ८३५२ क्रमांकाचा हा ट्रक मुलताई येथून पत्ताकोबी भरून ओरिसाला जात असल्याचे ट्रक चालक पवन पटवारी, वय 30 वर्षे याने सांगितले.