काटोल: मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काटोलमध्ये राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन
Katol, Nagpur | Oct 7, 2026 स्वायत्त संस्थांची स्वायत्तता धोक्यात आल्याचा आरोप करत आणि निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षतेवर शंका उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे काटोलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाध्यक्ष सलील देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले