नागारा तलाव रामटेक जवळ पिकअप वाहनाच्या धडकेत 21 वर्षीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू
Ramtek, Nagpur | Nov 12, 2026 रामटेक बायपास रोडवर असलेल्या नागारा तलावाजवळ गुरुवार दिनांक 12 नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान झालेल्या एका अपघातात एका 21 वर्षीय दूचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव प्रणय उमेश कोहपरे वय 21 वर्षे राहणार बोंदरी तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा असे आहे. नागारा तलावाजवळ एका भरधाव पिकअप ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकी ही अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकावर आढळली. यामुळे प्रणय रस्ता दुभाजकावर आदळला व यातच त्याने शेवटचा श्वास घेतला .