कामठी: नवीन कामठीत मेट्रो स्टेशनवरून २५ हजारांचे लोखंडी चॅनेल चोरीस; दोघांवर गुन्हा दाखल
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑरेन्ज सिटी मेट्रो स्टेशनवरून २५ हजार रुपये किमतीचे ५ लोखंडी चॅनेल चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.आरोपीमध्ये अब्दुल व त्याच्या साथीदार यांचा समावेश आहे. फिर्यादी गोपाल लक्ष्मणराव दोरशेठवार हे ऑरेन्ज सिटी मेट्रो स्टेशन येथे सिक्युरिटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.