रामटेक: कृउबा समिति रामटेक येथे शेतकरी भावनासाठी 1.81 कोटी रुपये च्या निधीस प्रशासकीय मान्यता, राज्यमंत्र्यांचे प्रयत्न
Ramtek, Nagpur | Oct 25, 2026 कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारणीच्या कामास राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्थानिक आमदार तथा राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एक कोटी 81 लाख 33 हजार 549 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे रविवार दिनांक 25 ऑक्टोबरला राज्यमंत्र्यांचे कार्यालय, रामटेक मार्फत सांगण्यात आले आहे.