राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा
Ramtek, Nagpur | Oct 30, 2026 राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी वन, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तीस ऑक्टोबर ला रवीभवन येथे संयुक्त आढावा बैठक घेऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी वनसंवर्धन, शेतकऱ्यांचे प्रश्न, पीक विमा, कृषी योजनांची अंमलबजावणी तसेच पशुधनासाठी चारा नियोजन या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वन विभागाच्या बैठकीत वनक्षेत्रातील पाण्याची नियोजन वन्यजीव संरक्षण आणि मानव वन्यजीव संघर्ष संदर्भातील समस्यांचा आढावा घेण्यात आला. तर कृषी विभागाच्या संदर्भात खरीप हंगामातील पीक परिस्थिती, आगामी रब्बी हंगामाची पूर्वतयारी आणि शासनाच्या विविध कृषी योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, पेच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अक्षय गजभिये, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, पशुसंवर्धन विभाग उपायुक्त डॉ. नितीन फुके यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.