केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माजी आ. डी. मलिकार्जुन रेड्डी यांच्या घरी आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमास सदिच्छा
Ramtek, Nagpur | Nov 15, 2026 दीपावलीनिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी माजी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांचे मनसर येथील निवासस्थानी आयोजित दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमास भेट दिली. माजी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित परिजन व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी गडकरी यांनी संवाद साधून दिवाळी तसेच कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यात.