दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी रामटेक येथे दिवाळी शिधा वाटपाचा शुभारंभ
Ramtek, Nagpur | Nov 7, 2026 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी रामटेक येथे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दिव्यांग बांधव व एकल विधवा भगिनींना शनिवार दिनांक 7 ऑक्टोबरला दुपारी दिवाळी शिधा वाटप करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विवेक तुरक, पारशिवनी तालुका प्रमुख राजू भोस्कर, मौदा तालुका प्रमुख प्रशांत भुरे प्रामुख्याने उपस्थित होते.