रामटेक येथे स्व. दत्ता मेघे यांच्या स्मारकव पुतळ्याचे अनावरण तसेच कृषी महाविद्यालय व पशु वैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण
Ramtek, Nagpur | Nov 12, 2026 कवडक रामटेक परिसरात तयार करण्यात आलेल्या लोकनेते स्व. दत्ता मेघे यांच्या स्मारक व पुतळ्याचे अनावरण तसेच नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले. गुरुवार दिनांक 12 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वाजता संपन्न झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, भारतीय पशुवैद्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. उमेशचंद्र शर्मा,कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर उपस्थित होत्या. याचप्रमाणे मेघे परिवाराच्या शालिनीताई दत्ता मेघे, आमदार समीर मेघे, सागर मेघे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.