मनसर येथे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Ramtek, Nagpur | Nov 16, 2026 आदिवासी समाजाचे महानायक क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबरला सकाळी मनसर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण,पूजन करून अभिवादन करण्यात आले. माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, सरपंच कैलास नरुले यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, सामाजिक कार्य, जागवलेला स्वाभिमान, इंग्रजा विरुद्ध त्यांचा लढा व स्वातंत्र्य लढ्यातील त्यांची योगदान याबाबत विचार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, सरपंच कैलास नरुले, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य बैजू खरे, रेखाताई मडावी, अजय मडावी ग्रा पं. पटगोवारी सरपंच मोहन भगत, तंटामुक्ती अध्यक्ष सौ सपना मडावी,दिलीप वरखडे, संदीप मडावी यांचे सहित आदिवासी बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.