कामठी: कामठीत मानसिक अस्वस्थ युवकाचा राडा; दोघांना मारहाण
Kamptee, Nagpur | Sep 30, 2026 बँक ऑफ इंडिया परिसर व चावडी चौकात एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ युवकाने विनाकारण सूरज बागडे व कुंदन श्रीवास या दोघांना थप्पड मारून मारहाण केल्याची घटना घडली.बहिणीच्या निधनानंतर या युवकाच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच जुना पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ तत्परता दाखवत युवकाला ताब्यात घेतले आणि कुटुंबीयांच्या सुपूर्द केले