रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध गावात आयोजित मंडई कार्यक्रमात राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांची भेट व शुभेच्छा
Ramtek, Nagpur | Nov 11, 2026 दिवाळीच्या पर्वावर कार्तिक पौर्णिमेपर्यंत रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध गावात मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी आदिवासी बहुल देवलापार क्षेत्रातील बोर्डा, डोंगरताल, फुलजरी, अकोला, हिवरा बाजार येथील मंडई उत्सवात भेट देऊन ग्रामवासियांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी रामटेक तालुका शिवसेनाप्रमुख विवेक तुरक,माजी पं. स.सभापती संजय नेवारे,माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, विनोद मरस कोल्हे यांचे सहित त्या त्या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.