फेक मोबाईल फोन पे करून रामटेक येथील किराणा दुकानदाराला फसविल्याच्या प्रकरणी नागपूरच्या युवकाला रामटेकात अटक
Ramtek, Nagpur | Nov 1, 2026 डॉ. आंबेडकर चौक, रामटेक येथील लारोकर किराणा स्टोअर्स येथून एक 15 किलो वजनाचा तेलाचा पिपा घेऊन त्याचे ऑनलाईन पेमेंट झाल्याचे सांगितले. परंतु त्याचे कोणतेही पैसे दुकानदाराच्या खात्यात न आल्याने आरोपीवर संशय आला. यादरम्यान आरोपी आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 49 ए वाय 55 68 ने पिपा घेऊन पळून जात असताना दिसून आल्याने दुकानदार व लोकांनी पकडून त्यास पोलिसाचे ताब्यात दिले. आरोपीचे नाव संजय लक्ष्मणदास लालवाणी वय 32 वर्षे राहणार हिरवी नगर, वर्धमान नगर नागपूर असे आहे. रामटेक पोलिसांनी रविवार दिनांक 1 नोव्हेंबरला आरोपी विरुद्ध कलम 318( 4) 340 (2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंदवून त्यास अटक केली आहे. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. आरोपीने रामटेक येथे याआधीही काही ठिकाणी अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे काही दुकानदारांनी घटनास्थळावर सांगितले. तर कोतवाली पोलीस स्टेशन नागपूर येथे आरोपीविरुद्ध 2025 मध्ये गुन्हा नोंद आहे. माहितीप्रमाणे आरोपीने आपल्या दुचाकीचा चार अंकी क्रमांक ही जाणून लपवून केवळ एक अंक ठळक दिसावा असा ठेवला आहे. रामटेक पोलिसांनी आरोपी संजय यासाठी करून अधिक तपास सुरू केला आहे.