रामटेक: चोर बाहुली परिसरात कंटेनर बॅरिकेटडला धडकला
Ramtek, Nagpur | Oct 24, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील चोरबावली शिवारात शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोंबर च्या मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान जबलपुर कडून नागपूरकडे येणाऱ्या कंटेनर क्रमांक जी जे 01 जीटी 39 66 च्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने त्याचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले व कंटेनर बॅरिकेड ला धडक देत रस्ता दुभाजकावर आढळला. यात कुठलीही हानी झाली नाही.