रामटेक: रामटेक शहरात श्री दुर्गा माता दौड उत्साहात संपन्न
Ramtek, Nagpur | Oct 18, 2026 नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने रविवार दिनांक 13 ऑक्टोबरला सकल हिंदू समाजाच्या वतीने रामटेक शहरात श्री दुर्गा माता दौड चे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर रामटेक येथून या दौडीला प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून निघालेली ही दौड रामटेक शहरातील प्रमुख मार्गावरून माँ कुमारिका माता मंदिर येथे पोहोचली. येथे दौडचे समापण करण्यात आले.