शिरपूर बोरी येथे स्वयंपाक घरातील भांड्यांच्या रॅक मधील सहा फुटी विषारी नागाचा रेस्क्यू
Ramtek, Nagpur | Oct 31, 2026 रामटेक जवळील शिरपूर बोरी येथील अनिल मडावी यांच्या स्वयंपाक घरातील भांड्यांच्या रॅकमध्ये दडून बसलेल्या एका सहा फूट विषारी नागाला शनिवार दिनांक 31 ऑक्टोंबर च्या मध्यरात्री साडेतीन वाजताच्या दरम्यान सर्पमित्र सागर धावडे रामटेक याने शिताफिने पकडून नागाला जीवनदान दिले. मात्र त्या कुटुंबातील पुढील अनर्थही टाळला. नाग पकडताच सर्वांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.