उमरेड: पोळा सण साजरा करून परतताना काळाचा घाला; उमरेडजवळ भीषण अपघातात भाऊ जागीच ठार, बहीण गंभीर
Umred, Nagpur | Sep 15, 2026 14 सप्टेंबरला सकाळी सात वाजताच्या सुमारास पोळा सणाचा आनंद घेऊन दुचाकीने घराकडे परतत असलेल्या बहीण-भावावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनियंत्रित झालेल्या एका ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार समोरून धडक दिली. या भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाला, तर बहीण गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मृतक तरुणाची वेदांशू वराडे अशी ओळख पटली आहे, तर गंभीर जखमी झालेल्या त्याच्या बहिणीचे नाव प्रिन्सी वराडे आहे.