रामटेक: चोर बाहुली शिवारात वादातून तरुणाची हत्या; दोन आरोपी अटकेत
Ramtek, Nagpur | Oct 14, 2026 सावनेर बस स्टैंड वर झालेल्या वादातून शिवकुमार अनिल कुमार सोमेश्वर वय 23वर्षे रा. परसवानी ता. कुरई जि.सिवनी म. प्र. याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती देवलापार पोलिसांनी बुधवार दि. 14 ऑक्टोबरला सायं. दिली. माहितीप्रमाणे मृतक शिवकुमार हा 5 ऑक्टोबरला अन्य दोन व्यक्तींसोबत दुचाकीने गावाकडे जात असल्याचे सांगून गावाकडे निघाला होता. मात्र तो घरी न पोहोचल्याने 11 ऑक्टोबरला नातेवाईकांनी सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर त्याचा मृतदेह चोरबावली शिवारात कुजलेला आढळला.