रामटेक: नेरला शिवारातील अवैध मोहफुल दारु भट्टीवर रामटेक पोलिसांची धाड
Ramtek, Nagpur | Oct 22, 2026 उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक रमेश बरकते यांनी तयार केलेल्या विशेष पथकाने पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या नेरला शिवारात कालव्याच्या किनाऱ्यावर सुरू असलेल्या मोहफुलाच्या अवैध दारू भट्टीवर धाड टाकून ती उध्वस्त केली. ही कारवाई दुपारी करण्यात आल्याची माहिती रामटेक पोलिसांनी गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबरला सायंकाळी दिली. या कारवाईत एक लाख 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.