Public App Logo
Profile Picture

The Public News

@thepublicnewspune
57Followers
0Following
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात दगडूशेठ बाप्पांचे भव्य प्रस्थान! 

पुण्याचे आराध्यदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे रथातून प्रस्थान होताच भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला.

बाप्पांच्या दर्शनासाठी आणि मिरवणुकीचा सोहळा अनुभवण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि भक्तीमय वातावरणाने पुणे शहर गणेशमय झाले.

 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 

<nis:link nis:type=tag nis:id=दगडूशेठ nis:value=दगडूशेठ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दगडूशेठगणपती nis:value=दगडूशेठगणपती nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गणपतीबाप्पामोरया nis:value=गणपतीबाप्पामोरया nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पुणे nis:value=पुणे nis:enabled=true nis:link/> गणेशोत्सव Ganpati2026 <nis:link nis:type=tag nis:id=dagdushethganpati nis:value=DagdushethGanpati nis:enabled=true nis:link/> PuneGanpati
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडपात विराजमान! 

ढोल-ताशांचा गजर... भक्तांचा जयघोष... आणि भक्तिमय वातावरण!

पुण्याचे आराध्यदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मंडपात विराजमान झाले असून, बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. 

बाप्पांच्या आगमनाने पुणे झाले गणेशमय! 

<nis:link nis:type=tag nis:id=दगडूशेठ nis:value=दगडूशेठ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दगडूशेठगणपती nis:value=दगडूशेठगणपती nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dagdushethganpati nis:value=DagdushethGanpati nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=puneganpati nis:value=PuneGanpati nis:enabled=true nis:link/> गणपतीबाप्पामोरया गणेशोत्सव पुणे Ganpati2026
३०० फूट उंच धबधबा… आणि थराराचा भन्नाट अनुभव!

पुणे जिल्ह्यातील लवासा परिसराच्या पुढे असलेल्या लिंग्या वॉटरफॉलवर माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी तब्बल ३०० फूट उंच धबधब्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा रोमांचकारी अनुभव घेतला.

फेसाळता धबधबा… 
चहूबाजूंनी पसरलेली हिरवाई… 
धुक्याची मनमोहक चादर… 
आणि उंच कड्यावरून दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा थरार… 

साहस, आत्मविश्वास आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हा अनुभव प्रत्येक क्षण अविस्मरणीय करणारा! 

सह्याद्रीच्या कुशीतला हा भन्नाट Adventure! 

<nis:link nis:type=tag nis:id=bachchukadu nis:value=BachchuKadu nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=lingyawaterfall nis:value=LingyaWaterfall nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=waterfallrappelling nis:value=WaterfallRappelling nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sahyadri nis:value=Sahyadri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sahyadridiaries nis:value=SahyadriDiaries nis:enabled=true nis:link/> MaharashtraTourism AdventureTourism Pune Lavasa Trekking Rappelling
पोलचे चोर कोण? या घोषणांनी महापालिका सभागृह दणाणले

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोंढवा भागातील रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे विद्युत पोल अज्ञातांनी कापून नेल्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवक आक्रमक झाले.

नगरसेवकांनी सभागृहाच्या मध्यभागी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. महिला नगरसेविकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. काही नगरसेवकांनी माईक हातात घेत प्रशासनाला जाब विचारला, तर इतर सदस्यांनी घोषणाबाजी करत त्यांना पाठिंबा दिला.

अध्यक्षीय आसनासमोर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज ठप्प झाले.

या प्रकरणाची चौकशी करून सभागृहाला माहिती देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन थांबवले.

पोल नेमके कोणी कापून नेले? या प्रश्नाचे उत्तर आता महापालिका प्रशासनाच्या चौकशीतून समोर येणार आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=pune nis:value=Pune nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punemunicipalcorporation nis:value=PuneMunicipalCorporation nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pmc nis:value=PMC nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punenews nis:value=PuneNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punepolitics nis:value=PunePolitics nis:enabled=true nis:link/> PMCNews Kondhwa PuneCity Maharashtra MunicipalCorporation ThePublicNews
एका विद्यार्थ्याने जीव गमावला… आता तरी MPSC आणि सरकार जागे होणार का?

MPSCची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत वेदनादायक आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या तरुणाचा असा अंत होणे, ही केवळ कौटुंबिक शोकांतिका नाही; तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे.

पेपरफुटी, कथित गैरप्रकार, निकालांबाबतचे प्रश्न आणि वारंवार बदलणारे नियम यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता आणि व्यवस्थेबद्दलचा अविश्वास वाढत आहे.

ग्रामीण आणि दुष्काळी भागातून अनेक विद्यार्थी उधार-उसनवारी करून पुण्यात येतात. वर्षानुवर्षे परीक्षा, निकाल आणि नियमांच्या अनिश्चिततेत अडकलेल्या विद्यार्थ्यांवर आर्थिक तसेच मानसिक ताण वाढत आहे.

MPSC आणि सरकारला काही थेट प्रश्न…

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणाची तयार�
बारामती–स्वारगेट मार्गावरील एसटी गाड्यांचा खेळखंडोबा!

स्वारगेटहून बारामतीच्या दिशेने निघालेल्या दोन नॉनस्टॉप एसटी बस रात्रीच्या वेळी बंद पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

रात्री ८ वाजताची गाडी क्रमांक २१९३ दिवे घाटाच्या वर बंद पडली. त्यानंतर प्रवाशांना एसटी चालकाने दुसऱ्या गाडी क्रमांक ४७९७ मध्ये बसवले; मात्र ही गाडीही मोरगावजवळ बंद पडली.

अखेर प्रवाशांना गाडी क्रमांक ०४९८ मधून बारामतीच्या दिशेने रवाना करण्यात आले. सलग दोन गाड्या बंद पडल्याने महिला, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

एसटी महामंडळाने गाड्यांची नियमित तपासणी करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत सेवा द्यावी, अशी मागणी होत आहे. 

बारामती–स्वारगेट मार्ग
 प्रवाशांचे हाल
 एसटी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी

<nis:link nis:type=tag nis:id=बारामती nis:value=बारामती nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=स्वारगेट nis:value=स्वारगेट nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=एसटीबस nis:value=एसटीबस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=एसटीमहामंडळ nis:value=एसटीमहामंडळ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punebaramati nis:value=punebaramati nis:enabled=true nis:link/> STBus MaharashtraNews
दत्तवाडी जुन्या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य!

दत्तवाडी जुन्या रस्त्यावरील कचरा मागील आठवड्यापासून उचलला गेलेला नाही. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि मैला पाणी साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, याच ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपाला तिन्ही बाजूंनी कचरा आणि मैला पाण्याने वेढले असल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

“डोळे घट्ट मिटून झोपलेल्या प्रशासनाला जाग तरी कधी येणार?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

परिसरातील कचरा तातडीने हटवून स्वच्छता करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अविनाश खंडारे यांनी दिला आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=दत्तवाडी nis:value=दत्तवाडी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=कचरासाम्राज्य nis:value=कचरासाम्राज्य nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=कचरा nis:value=कचरा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pmc nis:value=pmc nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punecity nis:value=punecity nis:enabled=true nis:link/> PuneNews
पुण्यात डीजेवरून राजकीय वातावरण तापले; आता संभाजी भिडेंचे वक्तव्य चर्चेत!

पुणे शहरात विद्यानंद बापट यांनी दहीहंडी आणि उत्सवांमधील डीजेच्या वापराविरोधात भूमिका घेतल्यानंतर या मुद्द्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बापट यांच्या भूमिकेला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही “डीजे बंद झाला पाहिजे” अशी भूमिका मांडली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे.

“ज्यांनी दहीहंडीत डान्सर नाचवल्या, ते सगळे देशद्रोही!”

दहीहंडी उत्सवातील डान्सरच्या मुद्द्यावरून संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

डीजे आणि दहीहंडीतील मनोरंजनाच्या पद्धतीवरून सुरू झालेला हा वाद आता कोणते नवे वळण घेणार?

तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा.

<nis:link nis:type=tag nis:id=sambhajibhide nis:value=SambhajiBhide nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vidyanandbapat nis:value=VidyanandBapat nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=rajthackeray nis:value=RajThackeray nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dahihandi nis:value=DahiHandi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dj nis:value=DJ nis:enabled=true nis:link/> DahiHandi2026 Pune PuneNews MaharashtraNews MarathiNews ThePublicNews संभाजीभि�
पुणे महापालिकेतील गटबाजीवर मोहोळांचा ‘ब्रेक’?

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी आणि नगरसेवकांची वाढती नाराजी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेतील सर्व नगरसेवकांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील कारभार, नगरसेवकांच्या तक्रारी आणि अंतर्गत नाराजीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांना मोहोळ नेमका कोणता कानमंत्र देणार? गटबाजीला आळा बसणार का? याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=मुरलीधरमोहोळ nis:value=मुरलीधरमोहोळ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पुणेमहानगरपालिका nis:value=पुणेमहानगरपालिका nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पुणेराजकारण nis:value=पुणेराजकारण nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पुणेनगरसेवक nis:value=पुणेनगरसेवक nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=भाजप nis:value=भाजप nis:enabled=true nis:link/> पुणे PMC पुणेनागरिक महाराष्ट्र ThePublicNews
MurlidharMohal PuneMunicipalCorporation PunePolitics PuneCorporation PuneCouncillors PMC BJP PuneNews MaharashtraPolitics PuneUpdates PuneCity ThePublicNews
शहात स्वाइन फ्लूच्या रुग्ण संख्येत वाढ ; दोन महिन्यांत ४८१ रुग्ण

ऑगस्टमध्ये ३७२ रुग्ण ; सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांत १०९ जणांना लागण

<nis:link nis:type=tag nis:id=pmc nis:value=pmc nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=h1n1 nis:value=h1n1 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punecity nis:value=punecity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=स्वाइनफ्लू nis:value=स्वाइनफ्लू nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punenews nis:value=punenews nis:enabled=true nis:link/>
पुणेकरांनो, पाणीसाठा करून ठेवा 

शहरातील बहुतांश भागांचा गुरुवारी (१० सप्टेंबर) पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे.

 देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार (९ सप्टेंबर) मध्यरात्री १२ ते गुरुवार (१० सप्टेंबर) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

 प्रभावित भागांमध्ये पर्वती, सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा, लोहगाव, धानोरी, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, येरवडा, औंध, बोपोडी, वारजे, कोथरूड, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, बावधन, खडकी, वानवडी, एनआयबीएम, कात्रज, धायरी, धनकवडी, सिंहगड रस्ता आदी शहरातील अनेक भागांचा समावेश आहे.

 नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाणीपुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=पुणे nis:value=पुणे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पुणेशहर nis:value=पुणेशहर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पाणीपुरवठा nis:value=पाणीपुरवठा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पाणीबंद nis:value=पाणीबंद nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pune nis:value=Pune nis:enabled=true nis:link/> PuneNews PuneWaterSupply PMC PuneMunicipalCorporation पुणेमहानगरपालिका पुणेकर
एमपीएससी पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

पुणे : एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढत संताप व्यक्त केला. या मोर्चात हजारो एमपीएससी विद्यार्थी सहभागी झाले होते.

परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या.

हातात फलक घेत आणि घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. अनेक वर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पेपरफुटीच्या घटनांमुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या या आक्रोशामुळे पुण्यातील स्पर्धा परीक्षा विश्वातील वातावरण चांगलेच तापले आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=mpsc nis:value=MPSC nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpscstudents nis:value=MPSCStudents nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पेपरफुटी nis:value=पेपरफुटी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=एमपीएससी nis:value=एमपीएससी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=विद्यार्थीआक्रोश nis:value=विद्यार्थीआक्रोश nis:enabled=true nis:link/> पुणे आक्रोशमोर्चा स्पर्धापरीक
खडकीत वाद-प्रतिवादानंतर पोलिसांनीच फोडली दहीहंडी!

वाद आणि प्रतिवाद... डीजेचा दणदणाट... कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर खडकीतील साम्राज्य प्रतिष्ठानच्या दहीहंडीचा अखेर अनोख्या पद्धतीने समारोप झाला.

डीजे बंद करण्यावरून कार्यकर्ते आणि खडकी पोलीस यांच्यामध्ये नुकताच वाद झाला होता. मात्र, परिस्थितीचे भान राखत पोलिसांनी अखेरीस डीजे बंद केला.

त्यानंतर खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत दहीहंडी फोडली आणि कार्यक्रमाचा समारोप केला.

पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे उत्सवाला वेगळेच स्वरूप मिळाले. कायदा-सुव्यवस्था आणि उत्सवाचा आनंद यांचा समतोल साधत पोलिसांनी स्वतः दहीहंडी फोडून एक आदर्श उपक्रम उभा केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

डीजेच्या दणदणाटाऐवजी पोलिसांच्या पुढाकारातून दहीहंडीचा समारोप... खडकीत चर्चेचा विषय!

<nis:link nis:type=tag nis:id=खडकी nis:value=खडकी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दहीहंडी nis:value=दहीहंडी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=साम्राज्� nis:value=साम्राज्� nis:enabled=true nis:link/>
कोंढव्यात चिखलाचे साम्राज्य; बिल्डरच्या ओव्हरलोड ट्रकमुळे नागरिक त्रस्त!

पुणे : कोंढवा खुर्दमधील शिवनेरी नगर, ब्रह्मा अवेन्यू चढण परिसरात नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बिल्डरच्या कामासाठी माती वाहून नेणारे मोठमोठे ट्रक आणि ओव्हरलोड वाहने या रस्त्यावरून सतत ये-जा करत आहेत. या वाहनांमधून माती रस्त्यावर पडत असल्याने पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत आहे.

चिखलामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शाळेत जाणारी लहान मुले, महिला तसेच परिसरातील नागरिक या परिस्थितीमुळे त्रस्त झाले आहेत.

विशेष म्हणजे, नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन माती वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, रस्ता स्वच्छ करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

नागरिकांचा सवाल : व
खडकीत दहीहंडी उत्सवात पोलिसांशी वाद ?? ; डीजे बंद करण्यावरून वातावरण तापल्याची माहिती 

खडकी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी खडकीतील एक दहीहंडी थांबविल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी डीजे सुरू असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत डीजे बंद करण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, यावेळी पोलीस कर्मचारी आणि आयोजकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दहीहंडी उत्सव सुरू असताना पोलिसांनी कार्यक्रम थांबवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

नेमका वाद कशामुळे झाला? पोलिसांनी दहीहंडी का थांबवली? याबाबत अधिक माहिती समोर आली नाही. 

<nis:link nis:type=tag nis:id=खडकी nis:value=खडकी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पुणे nis:value=पुणे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दहीहंडी nis:value=दहीहंडी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=साम्राज्यप्रतिष्ठान nis:value=साम्राज्यप्रतिष्ठान nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=डीजे nis:value=डीजे nis:enabled=true nis:link/> खडकीपोलीस पुणेन्यूज पुणेबातम्या दहीहंडीउत्सव BreakingNews PuneNews
“डॉल्बी कशासाठी लावताय?” राज ठाकरेंचा थेट सवाल!

ठाण्यातील मनसे मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले. सणांच्या नावाखाली डीजे आणि डॉल्बीचा अतिरेक करण्याला त्यांनी विरोध केला.

“पारंपरिक पद्धतीने सण साजरे करा. डॉल्बी कशासाठी लावताय? आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. धर्मामध्ये बेभान होऊ नका,” असे राज ठाकरे म्हणाले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मांडलेल्या या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=rajthackeray nis:value=RajThackeray nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mns nis:value=MNS nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=rajthackerayspeech nis:value=RajThackeraySpeech nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mnsnews nis:value=MNSNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thane nis:value=Thane nis:enabled=true nis:link/> DJ Dolby Ganeshotsav GanpatiFestival MarathiNews MaharashtraNews मनसे राजठाकरे गणेशोत्सव डीजे डॉल्बी ठाणे मराठीबातम्या सण संस्कृती
डीजे बंद झालाच पाहिजे!

पुण्यातील बालगंधर्व चौकात डीजेच्या वाढत्या आवाजाविरोधात पुणेकर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात घेतलेल्या भूमिकेला समर्थन देत नागरिकांनी मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणात वाजवण्यात आलेल्या डीजेचाही यावेळी निषेध करण्यात आला.

‘डीजे बंद झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज बुलंद केला.

सण-उत्सव साजरे करा, मात्र ध्वनिप्रदूषणाला आळा घाला, अशी मागणी पुणेकर नागरिकांकडून करण्यात येत आहे.

तुम्हाला काय वाटतं? सण-उत्सवात डीजेच्या मोठ्या आवाजावर बंदी असावी का?

<nis:link nis:type=tag nis:id=पुणे nis:value=पुणे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पुणेकर nis:value=पुणेकर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=डीजेबंदी nis:value=डीजेबंदी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ध्वनिप्रदूषण nis:value=ध्वनिप्रदूषण nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=विद्यानंदबापट nis:value=विद्यानंदबापट nis:enabled=true nis:link/> बालगंधर्वचौक दहीहंडी गणेशोत्सव पुणेबातम्या PuneNews DJBan NoisePollution
धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी पुण्यातील सर्वात मोठी दहीहंडी ठरल्याचा दावा केला जात आहे. 

पुण्यात धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक आणि गोविंदा पथकांच्या उपस्थितीने परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.

यंदाच्या उत्सवात झालेल्या विक्रमी गर्दीने आजवरचे सर्व उच्चांक मोडल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. जल्लोष, गोविंदांचा उत्साह आणि दहीहंडी फोडण्यासाठीची चुरस यामुळे संपूर्ण वातावरणात उत्साहाचे वारे पाहायला मिळाले.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीने पुण्यातील गोविंदा आणि नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

पुण्यातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीची चर्चा रंगली आहे!

<nis:link nis:type=tag nis:id=धर्मवीरआनंददिघे nis:value=धर्मवीरआनंददिघे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दहीहंडी nis:value=दहीहंडी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पुणे nis:value=पुणे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गोविंदा nis:value=गोविंदा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गोविंदापथक nis:value=गोविंदापथक nis:enabled=true nis:link/> दहीहंडीउत्सव गणेशोत्सव पुणेन्यूज Pune DahiHandi Govinda PuneNews Maharashtra
पुण्यातील मानाची धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी २०२६ उत्सवात मुंबईच्या अण्णाभाऊ साठे गोविंदा पथकाने थरारक कामगिरी करत मानाची दहीहंडी फोडली!

शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने आयोजित धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी जोरदार हजेरी लावली.

यावेळी मुंबईच्या अण्णाभाऊ साठे गोविंदा पथकाने अत्यंत रोमांचक आणि लक्षवेधी पद्धतीने तब्बल सात थरांचा मानवी मनोरा रचला आणि दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला.

या शानदार कामगिरीसाठी अण्णाभाऊ साठे गोविंदा पथकाने तब्बल ७ लाख १७ हजार ७७१ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. 

सात थरांचा हा थरार पाहण्यासाठी उपस्थित हजारो गोविंदा भक्त आणि पुणेकर अक्षरशः भारावून गेले. गोविंदांच्या जल्लोषाने आणि ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला!

<nis:link nis:type=tag nis:id=धर्मवीरआनंददिघे nis:value=धर्मवीरआनंददिघे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=आनंददिघे nis:value=आनंददिघे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दहीहंडी2026 nis:value=दहीहंडी2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दहीहंडी nis:value=दहीहंडी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=प्रमोदनानाभानगिरे nis:value=प्रमोदनानाभानगिरे nis:enabled=true nis:link/> अण्णाभाऊसाठे गोविंदापथक �
रोहित पवारांचा आक्रमक इशारा; MPSC विद्यार्थ्यांसाठी थेट सरकारला आव्हान!

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“MPSCच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करायची नाही. कारवाई करायची असेल तर माझ्यावर करा. माझं नाव रोहित पवार आहे,” असा थेट इशारा रोहित पवारांनी दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यास सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. रोहित पवारांच्या या भूमिकेनंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “एकच वादा, रोहित दादा” अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून दिल्या जात असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आता सरकार आणि विद्यार्थ्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=rohitpawar nis:value=RohitPawar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpsc nis:value=MPSC nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpscstudents nis:value=MPSCStudents nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpscupdate nis:value=MPSCUpdate nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpscprotest nis:value=MPSCProtest nis:enabled=true nis:link/> Maharashtra Pune StudentsProtest MPSCExam
इन्स्टाग्रामसाठी पोस्ट:

कोथरूडमध्ये दहीहंडीचा उत्साह; आजीबाईंचाही डीजेच्या तालावर ठेका!

पुण्यातील कोथरूड येथील जित ग्राऊंडवर दहीहंडी उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. उत्सवाच्या जल्लोषात वयस्कर आजीबाईंनीही डीजेच्या तालावर ठेका धरत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वयाची मर्यादा बाजूला ठेवत आजीबाईंचा उत्साह आणि आनंद पाहून परिसरातील नागरिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

<nis:link nis:type=tag nis:id=kothrud nis:value=kothrud nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dahihandi nis:value=dahihandi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dahihandifestival nis:value=dahihandifestival nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punecity nis:value=punecity nis:enabled=true nis:link/>
४८ तासांत रस्ता उखडला ! पुणे महापालिकेच्या कामाचा दर्जा नेमका कुठे?

मॉडेल कॉलनीतील बी. एम. थोरात चौकाजवळ पाइपलाइनच्या कामानंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण पुन्हा उखडले आहे. पाऊस नसतानाही डांबराचा थर निघाल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिका म्हणते, पाइपलाइनला गळती असल्याने रस्ता खराब झाला. पण गळतीची माहिती असताना रस्ता डांबरीकरण करण्याची घाई का?

करदात्यांच्या पैशातून रस्ता करा... दोन दिवसांत उखडा... पुन्हा त्याच रस्त्यावर खर्च करा!

ही कामाची गुणवत्ता की पैशांची उधळपट्टी?

ठेकेदारावर कारवाई होणार का? कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का?

पुणेकरांच्या पैशांचा हिशेब पुणेकरांनीच विचारायचा नाही तर कुणी?

<nis:link nis:type=tag nis:id=pune nis:value=Pune nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punenews nis:value=PuneNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pmc nis:value=PMC nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punemunicipalcorporation nis:value=PuneMunicipalCorporation nis:enabled=true nis:link/> ModelColony PuneRoads RoadQuality CivicIssues CitizenVoice PuneCity पुणे महापालिका रस्ते मॉडेलकॉलनी
सुवर्णयुगची दहीहंडी ७ थरांवर फोडली; राधेकृष्ण ग्रुपचा जल्लोष!

पुण्यातील बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची मानाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाने ७ थर रचून फोडली. शनिवारी रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी चौथ्या प्रयत्नात गोविंदांना हंडी फोडण्यात यश आले. विराज कांबळे यांनी हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला.

बेलबाग चौकाजवळील जय गणेश प्रांगणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने गोपाळभक्तांची गर्दी झाली होती. 
ढोल-ताशांचा गजर, डीजेचा ताल आणि गोविंदांच्या जल्लोषात दहीहंडी उत्सव रंगला.
 <nis:link nis:type=tag nis:id=सुवर्णयुगतरुणमंडळ nis:value=सुवर्णयुगतरुणमंडळ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dahihandipune nis:value=dahihandipune nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=govindapathak nis:value=GovindaPathak nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punecity nis:value=punecity nis:enabled=true nis:link/> 

<nis:link nis:type=tag nis:id=govindagovinda nis:value=govindagovinda nis:enabled=true nis:link/>
mpsc च्या विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी पुण्यात होणार आहे. औषध पुरवठा निरीक्षक या पदाचा पेपर फुटी नंतर राज्यातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. 
<nis:link nis:type=tag nis:id=punecity nis:value=punecity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpsc nis:value=mpsc nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpsckatta nis:value=mpsckatta nis:enabled=true nis:link/>
एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा सोमवारी पुण्यात!

पेपरफुटीच्या प्रकरणामुळे राज्यातील लाखो एमपीएससी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असलेल्या या आंदोलनाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=mpsc nis:value=MPSC nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpscstudents nis:value=MPSCStudents nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpscprotest nis:value=MPSCProtest nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mpscexam nis:value=MPSCExam nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=paperleak nis:value=PaperLeak nis:enabled=true nis:link/> MPSCAndolan