एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा सोमवारी पुण्यात!
पेपरफुटीच्या प्रकरणामुळे राज्यातील लाखो एमपीएससी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असलेल्या या आंदोलनाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
#MPSC #MPSCStudents #MPSCProtest #MPSCExam #PaperLeak MPSCAndolan
Haveli, Pune | Sep 5, 2026