डीजे बंद झालाच पाहिजे!
पुण्यातील बालगंधर्व चौकात डीजेच्या वाढत्या आवाजाविरोधात पुणेकर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात घेतलेल्या भूमिकेला समर्थन देत नागरिकांनी मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणात वाजवण्यात आलेल्या डीजेचाही यावेळी निषेध करण्यात आला.
‘डीजे बंद झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज बुलंद केला.
सण-उत्सव साजरे करा, मात्र ध्वनिप्रदूषणाला आळा घाला, अशी मागणी पुणेकर नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तुम्हाला काय वाटतं? सण-उत्सवात डीजेच्या मोठ्या आवाजावर बंदी असावी का?
#पुणे #पुणेकर #डीजेबंदी #ध्वनिप्रदूषण #विद्यानंदबापट बालगंधर्वचौक दहीहंडी गणेशोत्सव पुणेबातम्या PuneNews DJBan NoisePollution
Haveli, Pune | Sep 6, 2026