रोहित पवारांचा आक्रमक इशारा; MPSC विद्यार्थ्यांसाठी थेट सरकारला आव्हान!
MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“MPSCच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करायची नाही. कारवाई करायची असेल तर माझ्यावर करा. माझं नाव रोहित पवार आहे,” असा थेट इशारा रोहित पवारांनी दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यास सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. रोहित पवारांच्या या भूमिकेनंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “एकच वादा, रोहित दादा” अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून दिल्या जात असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आता सरकार आणि विद्यार्थ्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#RohitPawar #MPSC #MPSCStudents #MPSCUpdate #MPSCProtest Maharashtra Pune StudentsProtest MPSCExam
Haveli, Pune | Sep 6, 2026