पुणेकरांनो, पाणीसाठा करून ठेवा
शहरातील बहुतांश भागांचा गुरुवारी (१० सप्टेंबर) पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे.
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार (९ सप्टेंबर) मध्यरात्री १२ ते गुरुवार (१० सप्टेंबर) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
प्रभावित भागांमध्ये पर्वती, सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा, लोहगाव, धानोरी, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, येरवडा, औंध, बोपोडी, वारजे, कोथरूड, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, बावधन, खडकी, वानवडी, एनआयबीएम, कात्रज, धायरी, धनकवडी, सिंहगड रस्ता आदी शहरातील अनेक भागांचा समावेश आहे.
नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाणीपुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
#पुणे #पुणेशहर #पाणीपुरवठा #पाणीबंद #Pune PuneNews PuneWaterSupply PMC PuneMunicipalCorporation पुणेमहानगरपालिका पुणेकर
Haveli, Pune | Sep 7, 2026