धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी पुण्यातील सर्वात मोठी दहीहंडी ठरल्याचा दावा केला जात आहे.
पुण्यात धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक आणि गोविंदा पथकांच्या उपस्थितीने परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
यंदाच्या उत्सवात झालेल्या विक्रमी गर्दीने आजवरचे सर्व उच्चांक मोडल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. जल्लोष, गोविंदांचा उत्साह आणि दहीहंडी फोडण्यासाठीची चुरस यामुळे संपूर्ण वातावरणात उत्साहाचे वारे पाहायला मिळाले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीने पुण्यातील गोविंदा आणि नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
पुण्यातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीची चर्चा रंगली आहे!
#धर्मवीरआनंददिघे #दहीहंडी #पुणे #गोविंदा #गोविंदापथक दहीहंडीउत्सव गणेशोत्सव पुणेन्यूज Pune DahiHandi Govinda PuneNews Maharashtra
Haveli, Pune | Sep 6, 2026