४८ तासांत रस्ता उखडला ! पुणे महापालिकेच्या कामाचा दर्जा नेमका कुठे?
मॉडेल कॉलनीतील बी. एम. थोरात चौकाजवळ पाइपलाइनच्या कामानंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण पुन्हा उखडले आहे. पाऊस नसतानाही डांबराचा थर निघाल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका म्हणते, पाइपलाइनला गळती असल्याने रस्ता खराब झाला. पण गळतीची माहिती असताना रस्ता डांबरीकरण करण्याची घाई का?
करदात्यांच्या पैशातून रस्ता करा... दोन दिवसांत उखडा... पुन्हा त्याच रस्त्यावर खर्च करा!
ही कामाची गुणवत्ता की पैशांची उधळपट्टी?
ठेकेदारावर कारवाई होणार का? कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का?
पुणेकरांच्या पैशांचा हिशेब पुणेकरांनीच विचारायचा नाही तर कुणी?
#Pune #PuneNews #PMC #PuneMunicipalCorporation ModelColony PuneRoads RoadQuality CivicIssues CitizenVoice PuneCity पुणे महापालिका रस्ते मॉडेलकॉलनी
Haveli, Pune | Sep 5, 2026