एमपीएससी पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
पुणे : एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढत संताप व्यक्त केला. या मोर्चात हजारो एमपीएससी विद्यार्थी सहभागी झाले होते.
परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या.
हातात फलक घेत आणि घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. अनेक वर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पेपरफुटीच्या घटनांमुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या या आक्रोशामुळे पुण्यातील स्पर्धा परीक्षा विश्वातील वातावरण चांगलेच तापले आहे.
#MPSC #MPSCStudents #पेपरफुटी #एमपीएससी #विद्यार्थीआक्रोश पुणे आक्रोशमोर्चा स्पर्धापरीक
Haveli, Pune | Sep 7, 2026