पुण्यात डीजेवरून राजकीय वातावरण तापले; आता संभाजी भिडेंचे वक्तव्य चर्चेत!
पुणे शहरात विद्यानंद बापट यांनी दहीहंडी आणि उत्सवांमधील डीजेच्या वापराविरोधात भूमिका घेतल्यानंतर या मुद्द्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बापट यांच्या भूमिकेला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही “डीजे बंद झाला पाहिजे” अशी भूमिका मांडली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे.
“ज्यांनी दहीहंडीत डान्सर नाचवल्या, ते सगळे देशद्रोही!”
दहीहंडी उत्सवातील डान्सरच्या मुद्द्यावरून संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.
डीजे आणि दहीहंडीतील मनोरंजनाच्या पद्धतीवरून सुरू झालेला हा वाद आता कोणते नवे वळण घेणार?
तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा.
#SambhajiBhide #VidyanandBapat #RajThackeray #DahiHandi #DJ DahiHandi2026 Pune PuneNews MaharashtraNews MarathiNews ThePublicNews संभाजीभि�
Haveli, Pune | Sep 8, 2026