पुणे महापालिकेतील गटबाजीवर मोहोळांचा ‘ब्रेक’?
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी आणि नगरसेवकांची वाढती नाराजी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेतील सर्व नगरसेवकांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील कारभार, नगरसेवकांच्या तक्रारी आणि अंतर्गत नाराजीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नगरसेवकांना मोहोळ नेमका कोणता कानमंत्र देणार? गटबाजीला आळा बसणार का? याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
#मुरलीधरमोहोळ #पुणेमहानगरपालिका #पुणेराजकारण #पुणेनगरसेवक #भाजप पुणे PMC पुणेनागरिक महाराष्ट्र ThePublicNews
MurlidharMohal PuneMunicipalCorporation PunePolitics PuneCorporation PuneCouncillors PMC BJP PuneNews MaharashtraPolitics PuneUpdates PuneCity ThePublicNews
Haveli, Pune | Sep 8, 2026