खडकीत दहीहंडी उत्सवात पोलिसांशी वाद ?? ; डीजे बंद करण्यावरून वातावरण तापल्याची माहिती
खडकी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी खडकीतील एक दहीहंडी थांबविल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी डीजे सुरू असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत डीजे बंद करण्याच्या सूचना दिल्या.
मात्र, यावेळी पोलीस कर्मचारी आणि आयोजकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दहीहंडी उत्सव सुरू असताना पोलिसांनी कार्यक्रम थांबवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नेमका वाद कशामुळे झाला? पोलिसांनी दहीहंडी का थांबवली? याबाबत अधिक माहिती समोर आली नाही.
#खडकी #पुणे #दहीहंडी #साम्राज्यप्रतिष्ठान #डीजे खडकीपोलीस पुणेन्यूज पुणेबातम्या दहीहंडीउत्सव BreakingNews PuneNews
Haveli, Pune | Sep 6, 2026