सुवर्णयुगची दहीहंडी ७ थरांवर फोडली; राधेकृष्ण ग्रुपचा जल्लोष!
पुण्यातील बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची मानाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाने ७ थर रचून फोडली. शनिवारी रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी चौथ्या प्रयत्नात गोविंदांना हंडी फोडण्यात यश आले. विराज कांबळे यांनी हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला.
बेलबाग चौकाजवळील जय गणेश प्रांगणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने गोपाळभक्तांची गर्दी झाली होती.
ढोल-ताशांचा गजर, डीजेचा ताल आणि गोविंदांच्या जल्लोषात दहीहंडी उत्सव रंगला.
#सुवर्णयुगतरुणमंडळ #dahihandipune #GovindaPathak #punecity
#govindagovinda
Haveli, Pune | Sep 5, 2026