“डॉल्बी कशासाठी लावताय?” राज ठाकरेंचा थेट सवाल!
ठाण्यातील मनसे मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले. सणांच्या नावाखाली डीजे आणि डॉल्बीचा अतिरेक करण्याला त्यांनी विरोध केला.
“पारंपरिक पद्धतीने सण साजरे करा. डॉल्बी कशासाठी लावताय? आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. धर्मामध्ये बेभान होऊ नका,” असे राज ठाकरे म्हणाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मांडलेल्या या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.
#RajThackeray #MNS #RajThackeraySpeech #MNSNews #Thane DJ Dolby Ganeshotsav GanpatiFestival MarathiNews MaharashtraNews मनसे राजठाकरे गणेशोत्सव डीजे डॉल्बी ठाणे मराठीबातम्या सण संस्कृती
Haveli, Pune | Sep 6, 2026