कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेला कल्याणचा अभिषेक घोणे बेपत्ता!
नेपाळ-तिबेट बॉर्डरवर संपर्क तुटला; AI मध्ये ‘सेफ झोन’ची माहिती, कुटुंबीयांचा प्रशासनावर मदतीअभावी संताप
कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या कल्याणच्या अभिषेक घोणे यांच्याशी संपर्क तुटल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. २४ ऑगस्टला कल्याणच्या ठाणकर पाडा परिसरातून काठमांडूकडे रवाना झाल्यानंतर अभिषेक यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. बुद्ध गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केल्यानंतर पहाटे साडेपाच वाजता ते पुढील प्रवासासाठी निघाले. मात्र, नेपाळ-तिबेट बॉर्डरच्या दिशेने प्रवास सुरू असताना त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. अभिषेकसोबत सुमारे ९० पर्यटक असल्याची माहिती त्यांनी शेवटच्या संपर्कावेळी वडिलांना दिली होती. कुटुंबीय आणि मित्रांनी प्रशासनाशी संपर्क साधून अनेक प्रयत्न केले, मात्र अद्याप अभिषेकचा ठावठिकाणा लागलेला नाही. AI च्या माध्यमातून शोध घेतल्यानंतर
Kalyan, Thane | Aug 28, 2026