मेल एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशांच्या सोनसाखळीवर डल्ला; २४ तासांत दोन सराईत चोरटे जेरबंद!
‘सनी देवल’सह साथीदाराला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; अडीच लाखांची सोनसाखळी हस्तगत
कल्याण : मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन हातचलाखीने लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
दीपक चौहान आणि सनी देवल उर्फ भोला चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मेल एक्स्प्रेसमध्ये गर्दीचा फायदा घेत किंवा लक्ष विचलित करत महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याची पद्धत असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेली १७ ग्रॅम वजनाची, अंदाजे अडीच लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हस्तगत केली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फ�
Kalyan, Thane | Aug 28, 2026