भाजप कल्याण ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष श्याम गौड यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा अनोखा सामाजिक आणि पर्यावरणपूरक संकल्प
गरजूंना अन्नधान्य वाटपासह आठवडाभर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण;-
घरातील मोठी झालेली झाडे फेकू नका, आम्हाला द्या—आम्ही त्यांचे ‘ट्रान्सप्लांटेशन’ करू! - छत्रपती युवा फ्रंटचे आवाहन
भाजप कल्याण ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष श्याम गौड यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा अनोखा सामाजिक आणि पर्यावरणपूरक संकल्प करण्यात आला आहे. वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवावर न करता गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप तसेच आठवडाभर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच नागरिकांनीही आपल्या वाढदिवसाचे किंवा इतर कार्यक्रमांचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, घरातील मोठे झालेले झाड जागेअभावी तोडण्याची किंवा फेकून देण्याची वेळ आल्यास ते थेट नष्ट न करता श्याम गौड यांच्या टीमकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपलब्ध जागेनुसार अशा झाडांचे ट्रान्सप्लांटेशन करून त्यांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
“झाड मोठं झालं म्हणून तोडू नका… आम्हाला द्या, आम्ही ते वाचवू!” या संदेशातून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे
Kalyan, Thane | Aug 28, 2026