हजारो भगिनींच्या राख्यांनी भरून आला रविंद्र चव्हाणांचा दरबार; लाडक्या बहिणींसह नेपाळमधील अडकलेले नागरिक सुखरूप घरी पोहोचावेत, अशी प्रार्थना... भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण
डोंबिवलीच्या सावरकर रोडवरील भाजप कार्यालयात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो भगिनींनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मनगटावर राखी बांधत त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या भगिनींचे आभार मानले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे महिलांना बळ देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच नेपाळमध्ये घडलेली दुर्घटना वेदनादायी असल्याचे नमूद करत, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व नागरिक सुखरूप मायदेशी परतावेत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळ�
Kalyan, Thane | Aug 28, 2026