राजकीय धुसफुशीत ‘राखी’चा गोडवा!
शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख केतकी पोवार यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना बांधली राखी
शिवसेना आणि भाजपमधील फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या या अनोख्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
शिवसेना महिला शहरप्रमुख केतकी पोवार यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. राजकीय मतभेद आणि पक्षांतराच्या चर्चांमध्ये या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
Kalyan, Thane | Aug 28, 2026