कल्याण-डोंबिवलीत कंत्राटी सफाई कामगारांचा महापालिकेबाहेर ठिय्या; ५६ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी!
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय. ५६ कामगारांना कामावरून घरी बसवल्याचा आरोप करत त्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर सफाई केल्यानंतर कामगारांना स्वतःच्या मोबाईलवरून फोटो काढण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत कामगारांनी याला विरोध दर्शवला आहे. यापुढे सफाई झालेल्या ठिकाणांची पाहणी सुपरवायजरांनी स्वतः करून फोटो काढावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेच्या जयश्री पाटील यांनी दिला आहे. तसेच २७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयावर संविधान मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यां�
Kalyan, Thane | Oct 22, 2026