कल्याण स्टेशन परिसरात ‘CHAI CHOWK’चा शानदार शुभारंभ; अभिनेता रिषभ कश्यप गोलू यांच्या हस्ते उद्घाटन!
चहा प्रेमींसाठी पर्वणी! चहासोबत सँडविच आणि मोजिटोचीही मेजवानी; कल्याणकरांच्या भेटीला नवा चहाचा अड्डा
कल्याण : चहाचा आस्वाद घेणाऱ्या शौकिनांसाठी कल्याणमध्ये एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. कल्याण स्टेशन परिसरात ‘CHAI CHOWK’ या नव्या चहा आउटलेटचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता रिषभ कश्यप उर्फ गोलू यांच्या हस्ते करण्यात आले.
चहा प्रेमींसाठी खास आकर्षण ठरणाऱ्या या आउटलेटमध्ये चहासोबतच सँडविच आणि मोजिटोसारख्या पेयांचाही आस्वाद घेता येणार आहे. चहाचा आनंद घेण्यासाठी तसेच मित्रमंडळींसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण कल्याणकरांसाठी एक नवा पर्याय ठरणार आहे.
अभिनेता रिषभ कश्यप गोलू यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनामुळे या नव्या उपक्रमाला विशेष रंगत आली. चहा, खाद्यपदार्थ आणि पेयांची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी ‘CHAI CHOWK’ कितपत लोकप्रिय ठरते, याकडे आता कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.
Kalyan, Thane | Oct 23, 2026